आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिया तयार केल्यास शेतकऱ्यांना फायदा; गडकरींचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिया तयार केल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तालुका पातळीवर युरिन बँकेची स्थापना करण्याचे सुचवले आहे. एक लिटर मूत्रामागे एक रुपया द्यावा आणि युरिनपासून युरिया तयार करावा, अशी अभिनव संकल्पना गडकरींनी बोलून दाखवली.
 
शेतकऱ्यांना खत म्हणून युरिया दिल्यास फायदाच होईल. त्याचप्रमाणे युरियाची आयातही कमी होईल, असे गडकरी म्हणाले, एका मुलाखतीत गडकरींनी ही संकल्पना सांगितली. स्वीडनच्या काही वैज्ञानिकांशी बोलणी सुरु असून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मानवी मूत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन असते, मात्र ते वाया जाते. टाकाऊतून टिकाऊ गोष्टींची निर्मिती करणे, हे माझं पॅशन आहे. फॉस्फरस आणि पोटॅशिअम यासारखे सेंद्रीय पर्याय उपलब्ध आहेतच. त्यात नायट्रोजनची भर टाकल्यास रोपांच्या वाढीसाठी आवश्यक पोषकद्रव्ये मिळतील, असा विश्वास गडकरींना वाटतो.
बातम्या आणखी आहेत...