आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Backword Commision President Justice Bhatiya

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. जे. एच. भाटिया यांची नियुक्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती जे. एच. भाटिया यांची आज नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल.

यापूर्वी 31 डिसेंबर 2011 रोजी उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमुर्ती डॉ. बी. पी. सराफ यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. न्या. डॉ. सराफ यांचे निधन झाल्यामुळे अध्यक्षपद रिक्त झाले होते.

श्री. भाटिया हे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती असल्यामुळे त्यांचा दर्जा निवृत्त न्यायमुर्तीचा राहील. त्याचप्रमाणे इतर सदस्यांचा दर्जा राज्य शासनाच्या सचिवस्तराचा राहणार आहे. या आयोगाच्या अध्यक्षांचे मानधन 10 हजार रूपयांवरून 40 हजार रूपये, तर सदस्यांचे मानधन तीन हजार रूपयांवरून 10 हजार रूपये
वाढविण्यात आले आहे.