आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Bjp Core Leaders Meeting Is Going At Mumbai,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप 144 जागांवर ठाम, प्रसंगी कठोर भूमिका घेण्याचे भाजप नेत्यांचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप आणि शिवसेनेची मागील 25-30 वर्षापासून असलेल्या महायुतीत प्रथमच जबरदस्त असा तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव जागावाटपावरून झाला असून, भाजपला 144 जागा हव्या आहेत. मात्र, सेनेने नकार दिल्याने जे काही होईल ते होऊ द्या असा संदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने दिल्याचे कळते. त्यामुळे महायुती फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, भाजपचे नेते विनोद तावडे यांनी भाजप-शिवसेनेची युती अभेद्य राहील असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
याच दरम्यान, स्वतंत्र लढायचे का याची चाचपणी करण्यासाठी प्रदेश भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक मुंबईत सुरु झाली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. याचबरोबर या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी राजीवप्रताप रूडी, निवडणूक प्रभारी ओम माथूर यांनी हजेरी लावली आहे.
भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा येत्या 4 सप्टेंबरला (बुधवारी) मुंबई दौ-यावर येत आहेत. यावेळी जागावाटपाबाबत निर्णय होईल असे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याआधीच भाजपचे शिवसेनेवर दबावाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे.
रविवारी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्रातील नेते नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपला 144 जागा हव्या असल्याचे सांगितले होते. तसेच शिवसेना 144 जागा सोडणार नसेल तर पुढचा निर्णय घेण्यास दोन्ही पक्ष मोकळे असल्याचे सांगत भाजप आता शिवसेनेसोबत फरफटत जाणार नाही असे स्पष्ट सांगितले. याचबरोबर अमित शहा यांनीच 50 टक्के जागा मिळायला हव्यात असे सांगत भाजपची रणनिती काय असेल ते स्पष्ट केले होते.
पुढे वाचा, भाजपची काय आहे रणनिती विधानसभा निवडणुकीसाठी...