आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Bjp Spokeman Madhu Chavan Resigned From Party

बलात्काराच्या आरोपानंतर मधु चव्हाणांकडून भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाण यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मधु चव्हाण यांच्यावर गुरुवारी एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यामुळे चव्हाण यांनी स्वत:हून आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला.

चव्हाण हे पक्षातील जाणते नेते आहेत. त्यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषविले आहे. सध्या ते पक्षाचे प्रवक्ते होते. मात्र गुरुवारी एका महिलेने चव्हाण यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. याबाबत मुंबईतील काळाचौकी पोलिसात चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने पोलिस तक्रारीत म्हटले होते की, चव्हाण यांनी मागील 20 वर्षापासून आपले लौंगिक शोषण केले. तसेच लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर वेळोवेळी बलात्कार केला.

दरम्यान, प्रदेश भाजपने याबाबत कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच च व्हाण यांनी राजीनामा देताच तो तत्काळ स्वीकारण्याची भूमिका घेतली. निवडणुकीच्या तोंडावर भाजप कोणतेही रिस्क घ्यायला तयार नाही. मधु चव्हाण यांनीही आपल्याला राजकीय व सार्वजनिक जीवनातून उठविण्यासाठी हे आरोप केले असल्याचे म्हटले आहे.