आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारवी विज्ञान शाखेच्या परीक्षा वेळापत्रकात बदल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.

बारावी विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात सीबीएसई बोर्डाच्या काही धड्यांचा समावेश केला आहे. तसेच काही विषय अद्याप पूर्ण शिकवून झालेला नाही. त्यामुळे परीक्षांच्या तारखात बदल करण्याची मागणी केली जात होती. पालक आणि शिक्षकांनी केलेल्या मागणीचा विचार करुन राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, रसायनशास्त्रचा (केमेस्ट्री) पेपर २७ फेब्रुवारी ऐवजी २६ मार्चला घेतला जाणार आहे. तर, जीवशास्त्राचा (बायलॉजी) पेपर ४ मार्च ऐवजी १७ मार्चला होणार आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला आणखी काही दिवस मिळणार आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.