आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चार दिवसांत गुंडाळणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या चार दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे. लेखानुदानापुरतेच हे अधिवेशन मर्यादित करायचे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यपालांच्या अभिभाषणात घोषणांचा महापूर आणायचा, असा सत्ताधारी काँग्रेस व राष्‍ट्रवादीचा डाव असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
24 फेबु्रवारीपासून अधिवेशनाला सुरुवात होत असून 28 फेबु्रवारीला त्याचे सूप वाजेल. आगामी निवडणुका लक्षात घेता चार दिवसांत अधिवेशन आटोपते घेण्याचा निर्णय मंगळवारी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार असल्याने त्यात सरकारकडून आकर्षक योजनांचा वर्षाव होण्याची चिन्हे आहेत. अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षांना सरकारला झोडपून काढण्याची नामी संधी असते. शिवाय लेखानुदानामुळे खातेनिहाय चर्चा होणार नसल्यामुळे प्रस्तावित योजनांमधील फोलपणा दाखवण्याची संधीही या वेळी विरोधकांना मिळणार नाही. फक्त पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या माध्यमातून विरोधकांना सरकारला लक्ष्य करता येऊ शकेल. अधिवेशनात 16 विधेयके मांडण्याची शक्यता असून त्यात पाच प्रस्तावित, तर पाच प्रलंबित विधेयकांचा समावेश आहे.
सावकारी नियमन, ग्रामपंचायत
सुधारणा, पोलिस सुधारणा, पुरवणी नियोजन, लेखानुदान, विधी विद्यापीठ, नगररचना सुधारणा, करमणूक शुल्क आदींचा यात समावेश असेल.