आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजना करणारा तसेच काही वस्तूंवरील करात वाढ सुचविणारा राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत सादर केला. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला यंदा दुष्काळाचा फटका बसला आहे. दुष्काळामुळे पिण्याच्या पाणीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. नापिकीमुळे बहुतेक गावे ओस पडली आहे. लोक मोठ्या संख्येने शहरांकडे स्थलांतरीत होत आहेत. जनावरांना चारा नाही. शेतीसाठी पाणी नसल्याने दुष्काळग्रस्तांना उपासमारीची वेळ आली आहे. या प्रार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलच राज्यातील दुष्काळ तीव्र असल्याचे सांगितले. त्यामुळे सन 2013 च्या अर्थसंकल्पात दुष्काळ निवारणासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आल्याचेही पवार यांनी जाहीर केले. दुष्काळ निवारणासाठी मात्र सगळ्यांनी एकत्र येण्याचीही आवश्यकता असल्याचे पवार यांनी आवर्जुन सांगितले. राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1164 कोटींचा विशेष निधी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पिण्याच्या पाण्यासाठी 200 कोटींचा विशेष निधी देण्याची घोषणाही पवार यांनी केली. शेतकर्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या समन्वयातून राज्यातील जनतेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तंबाखूजन्य पदार्थ मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे सिगारेटवरील कर 20 टक्क्यांवरून 25 टक्के कर प्रस्तावित करण्यात आला आहे. तर विडीवरील कर पाचवरून 12.50 टक्के करण्यात आला आहे. तसेच सोने- चांदीसारख्या मौल्यवान धातुंवर एक टक्के कर आहे तो आता 1.10 टक्के आकारला जाणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी लागणार्या वस्तू यातून वगळण्यात आल्या आहेत. तसेच सौंदर्यप्रसाधनावर साडेबारा टक्के कर आकारला जाणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.