आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजना करणारा तसेच काही वस्तूंवरील करात सूचविणारा सन 2013-14 चा राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत सादर केला. जीवनावश्यक वस्तू स्वस्त केल्या आहेत. त्यात नित्य लागणार्या दूध करमुक्त केले आहे. तंबाखूजन्य पदार्थ मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे सिगारेटवरील कर 20 टक्क्यांवरून 25 टक्के कर प्रस्तावित करण्यात आला आहे. तर विडीवरील कर पाचवरून 12.50 टक्के करण्यात आला आहे. तसेच सोने- चांदीसारख्या मौल्यवान धातुंवर एक टक्के कर आहे तो आता 1.10 टक्के आकारला जाणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी लागणार्या वस्तू यातून वगळण्यात आल्या आहेत. तसेच सौंदर्यप्रसाधनावर साडेबारा टक्के कर आकारला जाणार आहे. काय महागणार- मद्य (देशी- विदेशी) सिगारेट आणि विडी तंबाखू सोने चांदी हिरे लॉटरी साखर सौंदर्य प्रसाधने पेव्हर ब्लॉक्स औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारे कापड काय होणार स्वस्त- गहू डाळ पीठ चहा बेदाणे मीठ खजूर तांदुळ ट्रॅक्टर ह्रदय शस्त्रक्रिया उपकरणे हळद मीरची चिंच वॉटर मीटर हातपंप उत्खनन यंत्र अपंगांची वाहने दूध जीवनावश्यक वस्तू
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.