आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेचे दोन नेते उद्या घेतील शपथ, उद्धव ठाकरे यांची अधिकृत घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जालन्‍याचे अर्जुन खोतकर आणि जळगाव ग्रामीणमधील गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे दोन नेते अखेर मंत्रिमंडळाच्‍या विस्‍तारात सहभागी होऊन उद्या शपथ घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
गुरुवारी सायंकाळी मातोश्रीवर शिवसेनेची बैठक घेण्‍यात आली. दुसरीकडे मुख्‍यमंत्र्यांनीही मंत्रिमंडळाच्‍या विस्‍ताराबाबत बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला शिवसेना नेत्‍यांनी दांडी मारल्‍याचे दिसले. शिवसेनेचे कुठले नेते मंत्रिपदाची शपथ घेतील या प्रश्‍नावर सकाळपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर शिवसेनेकडून दोन नावं समोर आली आहे. उद्या सकाळी 9 वाजता विधानभवनाच्‍या सेंट्रल व्‍हालमध्‍ये शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यात शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील हे दोन नेते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्‍या सोहळ्यात उद्धव ठाकरे उपस्‍थित राहतील का याची अधिकृत माहिती नाही अद्यापतरी समोर आली नाही.
बातम्या आणखी आहेत...