आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी (ता.चार) होणारी बैठक रद्द झाली. नियोजित वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बैठीकीला न पोहोता आल्याने मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली. चव्हाण हे नागपूर दौ-यावर होते.
बुधवारी ( ता. पाच) लोकसभा निवडणुकाच्या तारखा भारतीय निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार आहे. आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारची ( ता. चार) बैठक शेवटची होती. या बैठकीत मराठा आरक्षण, पिंपर चिंचमधील अनधिकृत बांधकाम, अवकाळी पाऊस आदी विषयांवर निर्णय घेतले जाणार होते. पण मुख्यमंत्री नियोजित वेळी न पोहोचल्याने राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.