आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफटीआय आंदोलनात भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुणे येथील फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफटीआयआय)प्रमुख अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला हरकत घेत विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनप्रकरणी उच्च न्यायालयाने खुलासा मागितला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण खाते, गृह खाते, राज्य सरकार आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनाही नोटीस बजावत आंदोलनावरील तोडग्याबाबत दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनावर आता न्यायालयानेच तोडगा काढावा, यासाठी अॅड. विनीत धांडा यांनी याचिका दाखल केली आहे. तसेच सद्यस्थितीत १८ विद्यार्थी वर्गात हजर राहू इच्छितात. या विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांना पोलिस संरक्षण देऊन वर्गात हजर राहण्यासंदर्भात संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, असेही अॅड. धांडा म्हणाले.