आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादचा झाला तर मराठवाड्याचा विकास, पृथ्वीराज चव्हाण यांची खास मुलाखत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- औरंगाबादचा औद्योगिक विकास झाला तर मराठवाड्याचा औद्योगिक विकास आपोआपच घडून येईल. त्यामुळे आधी औरंगाबादचा विकास करू द्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठवाड्यासह राज्याच्या औद्योगिक विकास वा अन्य प्रश्नांबाबत मते मांडली. मुख्यमंत्र्यांनी रविवारी दै. ‘दिव्य मराठी’ला खास मुलाखत दिली. काही झाले तरी औरंगाबादचे पाणी उद्योगांसाठी वळवले जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. जायकवाडीसह राज्यातील धरणांमधील पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी जागतिक दर्जाच्या संस्थेची मदत घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्योग आकर्षित करण्यासाठी कर परतावा वीज दर कपातीसारखे उपाय आखल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाणी वाटपाच्या प्रश्नावर तंत्रशुद्ध तोडगा काढण्यासाठी द. ऑस्ट्रेलियातील एका राज्याशी करार केला आहे.
(दुष्काळाची घोषणा का नाही, या प्रश्नावर)

>डीएमआयसी, औरंगाबादचा पाणीप्रश्न
उत्तर : शेंद्रा-िबडकीनच्याउद्योगांना पाणी देण्यासाठी ८०० कोटींची स्वतंत्र योजना आहे. पर्जन्यजल संवर्धन, सांडपाण्यावर प्रक्रियेद्वारे आिण जायकवाडी धरणातून उद्योगांना पाणी देता येईल. औरंगाबाद शहराच्या पाण्याचा एक थेंबही उद्योगांना दिला जाणार नाही. यासाठी जायकवाडीतून स्वतंत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था आहे.

महाराष्ट्र भूमी महसूल संहितेत ( एमएलआरसी) दुष्काळ शब्द कुठेही नाही. टंचाई आहे. दुष्काळ बोली भाषेतील शब्द आहे. दुष्काळ वा टंचाई काहीही म्हणा, सरकार टंचाई िनर्मूलनाच्या उपाययोजनाच जाहीर करते.
>जायकवाडीचे समन्यायी पाणीवाटप...
गेलीकाही वर्षे पुरेसा पाऊसच नाही. त्यामुळे पाणीच नाही तर वाटपाची गोष्ट दूरच. न्यायालयात याबाबत आम्ही भूमिका मांडली आहे. जलसंपदा प्राधिकरणाने कोणत्या धरणातून किती केव्हा पाणी सोडायचे याचा निर्णय घेतला पाहिजे. अर्थात हा तातडीचा उपाय आहे. पावसाचे पाणी, जलसाठ्याच अचूक मोजमाप, हे पाणी कोठून, केव्हा सोडल्यास किती वेळात पोहोचेल? बाष्पीभवनाने घट किती होईल याची गणिती मॉडेल्स करार केलेली जागतिक दर्जाची संस्था तयार करेल त्यानुसार पाणीवाटप होईल.
ही दीर्घकालीन योजना आम्ही आखली आहे. हायड्रालिलक्स क्षेत्रातील ही संस्था जागतिक दर्जाची तज्ञ्ज आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात याला व्हॉट इफ अॅनॅलिसिस म्हणतात.