आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State congress and ncp contro re start, Pawar Meeting

भुजबळ, तटकरेंना भ्रष्टाचारप्रकरणी शरद पवारांची 'क्लीन चीट'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सिंचन घोटाळ्याप्रकरणी पाटबंधारेमंत्री सुनील तटकरे आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामप्रकरणी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची पाठराखण करीत पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांना क्लीन चीट दिली आहे. तटकरे व भुजबळ यांनी संबंधित कामे करताना आपल्या पदाचा गैरवापर केला नाही. याची संबंधित कागदपत्रे मी स्वत तपासली आहेत, अशा शब्दात त्यांनी आपल्या दोन्ही मंत्र्यांचा बचाव केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांची शनिवारी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. यात त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच राज्यामध्ये असलेल्या दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठीही काही सूचना जिल्हाध्यक्षांना दिल्या. जिल्हा पातळीवर पक्ष वाढीसाठी भेडसावत असलेल्या अडचणी त्यांनी यावेळी समजून घेतल्या. त्यानंतर पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अजित पवारांना हवी 'मोकळीक' - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शनिवारी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या ढवळाढवळ करण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आमच्या पक्षाच्या मंत्र्यांना संबंधित खात्यात निर्णय घेण्यास स्वातंत्र व मोकळीक हवी आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व अशोक चव्हाण या मुख्यमंत्र्याप्रमाणे आम्हाला स्वातंत्र मिळायला हवे, अशी अजित पवार यांनी मागणी केली.
मदतीचे निवेदन केंद्राला पुन्हा पाठवा: शरद पवार यांची सूचना
मराठा नेत्यांमध्येही ऐक्य नाही : आठवले यांचे पवारांना प्रत्‍युत्तर
शरद पवारांवर भुजबळ आणि तटकरेंवरुन दबाव वाढला