आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Congress Delegation Meet President Regarding Fadanvis Govt\'s Vote Of Confidence Issue

विश्वासदर्शक वाद: काँग्रेस शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार, BJP च्या आडून NCP वर निशाणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या वादग्रस्त पद्धतीने बहुमत सिद्ध करण्याचा मुद्दा लावून धरणार आहेत. फडणवीस सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत सिद्ध करावे या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळ पुढील तीन-चार दिवसात राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. याआधी प्रदेश काँग्रेसने राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन अशीच मागणी केली होती. दरम्यान, यामागे राष्ट्रवादीचा धर्मनिरपक्षेतेचा बुरखा फाडण्यासाठी काँग्रेस भाजपच्या आडून राष्ट्रवादीवर निशाणा साधत आहे. भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे हे जाहीर झाल्यास राष्ट्रवादीला मानणारी दलित व मुस्लिम व्होट बॅंक काँग्रेसकडे वळविण्यासाठी काँग्रेसने ही खेळी केली आहे.
12 नोव्हेंबरला भाजपप्रणित देवेंद्र फडणवीस यांच्या अल्पमतातील सरकारने आव्वाजी पद्धतीने बहुमत असल्याचे सांगत बहुमताचा ठराव मंजूर करून घेतला होता. मात्र, भाजपला केवळ 122 आमदारांचाच पाठिंबा आहे. तसेच राज्यपालांकडेही तेवढ्याच आमदारांचे समर्थन असल्याचे पत्रक फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर काही अपक्ष व इतर छोट्या पक्षांच्या 10 आमदारांनी भाजपला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. तरीही भाजपला पाठिंबा देणा-या आमदारांची संख्या 133 च्या वर जात नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत 41 जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बिनशर्त बाहेरून पाठिंबा जाहीर केला. गरज भासली तर फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान करू अशीही राष्ट्रवादीने भूमिका जाहीर केली होती. मात्र, राष्ट्रवादीची ही भूमिका जशी भाजपला अडचणीची वाटत आहे तशीच राष्ट्रवादीतील धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेल्या नेत्यांसाठीही ती अडचणीची ठरत आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबरला भाजप व राष्ट्रवादीने संगनमत करून आवाजी पद्धतीने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याचा घाट घातला व तसा तो मंजूर करूनही घेतला. त्यामुळे भाजपप्रणित फडणवीस सरकारला नेमक्या किती आमदारांचा पाठिंबा आहे हे उघड होऊ शकले नाही. तसेच बहुमताच्या बाजूने राष्ट्रवादीला मतदान करण्याची वेळच आली नसल्याने त्यांचा खरा चेहरा पुढे आलाच नाही.
दरम्यान, या घडामोडींनंतर या मुद्यावर शिवसेना व काँग्रेस एकत्र आली. या दोन्हीही पक्षांनी राज्यपालांची भेट घेऊन फडणवीस सरकार अल्पमतात असून ते सरकार बरखास्त करावे अशी मागणी केली. मात्र, राज्यपाल राव यांनी या पक्षांच्या भूमिकेकडे काहींसे दुर्लक्ष केले. त्यामुळे काँग्रेस आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन फडणवीस सरकारला नेमक्या किती आमदारांचा पाठिंबा आहे हे सांगण्यास भाग पाडावे व बहुमत ठराव पुन्हा घ्यावा अशी मागणी केली आहे.
पुढे आणखी वाचा, यासंबंधातील अंतर्गत राजकारणाबाबत...