आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे पुन्हा गाजर, दिल्लीत हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाली तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीलाही तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही काँग्रेस पक्षाने मंत्रिमंडळातील तीन रिक्त मंत्रिपदे भरली नाहीत. याचबरोबर काँग्रेसच्या कोट्यातील महामंडळे, शासकीय समित्या व राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपदही मुख्यमंत्री चव्हाण यांनी भरले नाही. त्यामुळे चव्हाण यांच्या धोरणावर काँग्रेसमधील मंडळीच नाराज आहेत. मात्र, आता लोकसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना पक्षांतर्गत नाराजी दूर करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पक्षाच्या कोट्यातील तीन रिक्त मंत्रिपदे व महामंडळाच्या रिक्त जागा भरण्याच्या हालचाली दिल्ली पातळीवर सुरु झाल्या आहेत. मात्र, राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आता तरी खरेच पदे मिळणार की पुन्हा मागील चार वर्षाप्रमाणे गाजरच दाखविले जाणार याबाबत उत्सुकता आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंगळवारी आपल्या शिष्टमंडळासह दिल्लीत गेले होते. त्यावेळी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांनी राज्यातील विविध प्रश्न मार्गी लावले असल्याची बातम्या आल्या आहेत. मात्र, त्याच दिवशी चव्हाण यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे समजते. नागपूर अधिवेशन 9 डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्यापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार व महामंडळाच्या नियुक्त्या करण्याचे काँग्रेसच्या गोटात घोटत आहे. मात्र, त्याला खरेच मुहूर्त मिळणार का याची धास्ती खुद्द काँग्रेसमधील मंडळींनाच आहे. कारण मुख्यमंत्री कोणत्याही मुद्यावर तातडीने निर्णय घेत नाहीत.
आणखी पुढे वाचा........