आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Department Of Transportation Give Wrong Information

भोंगळ कारभार- राज्याच्या परिवहन अधिकाऱ्याने केले "लाखाचे बारा हजार'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याच्या परिवहन विभागाने विविध करांद्वारे २००८ ते २०१२ या चार वर्षांदरम्यान केलेल्या वसुलीचे परिवहन आयुक्तांच्या अहवालातील आकडे आणि माहिती अधिकारातून दिलेले आकडे यांच्यात तफावत आढळून आल्याने परिवहन विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या चार वर्षांत परिवहन विभागाने विविध करांच्या माध्यमातून फक्त १३० कोटी २६ लाख महसूल गोळा केल्याची माहिती एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र या चार वर्षांत परिवहन विभागाने तब्बल २७३६ कोटी ४१ लाखांचा महसूल गोळा केल्याचे पुरावे "दिव्य मराठी'च्या हाती लागले आहेत. त्यामुळे परिवहन विभागाच्या हेतूबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्य परिवहन विभागाने २००८ ते २०१२ या चार वर्षांत प्रवासी कर आणि बालपोषण अधिभारापोटी २७३६ कोटी ४१ लाख रुपये वसूल केले आहेत. परिवहन आयुक्तांनी राज्य सरकारला २०१२ मध्ये सादर केलेल्या आपल्या अहवालात पान क्रमांक २३६ वरच ही बाब नमूद केली आहे. मात्र, या विषयी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी ८ मे २०१४ रोजी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे अर्जाद्वारे विचारणा केली असता त्यांना मात्र चुकीची माहिती दिल्याची बाब उघड झाली आहे. आयुक्त कार्यालयातील जन माहिती अधिकाऱ्याच्या सहीनिशी शिरोडकर यांना २२ ऑगस्ट २०१४ रोजी जे उत्तर प्राप्त झाले आहे त्यात मात्र महसुली वसुलीची रक्कम २७३६ कोटी ४१ लाखांऐवजी फक्त १३० कोटी २६ लाख इतकी दाखवण्यात आली आहे. आयुक्तांच्या अहवालात एक आणि माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तरात मिळालेल्या भलत्याच माहितीने माहिती अधिकार कार्यकर्ते चक्रावून गेले आहेत. यातील खरी माहिती कोणती असा प्रश्न शिरोडकर यांनी विचारला आहे.
एवढी तफावत शक्य नाही : झगडे
आकडेवारी कुणालाच तोंडपाठ नसते. त्यामुळे याबाबत लगेच आताच्या आता मला काही सांगणे शक्य होणार नाही. आपण याबाबत माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर चौकशी करा. त्यानंतर मी याविषयी बोलतो. पण आकड्यांमध्ये एवढी तफावत असणे शक्य नाही. माहिती देताना काहीतरी तांत्रिक चूक झाली असण्याची शक्यता आहे. कारण कोणताही अधिकारी उगीचच खोटी माहिती देणार नाही. - महेश झगडे, परिवहन आयुक्त
पुढील स्‍लाइडवर वाचा, आकडेवारीतील घोळ