आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीज कर्मचार्‍यांना 25 टक्के पगारवाढ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील वीज कर्मचार्‍यांना 25 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीच्या सुमारे 85 हजार कर्मचार्‍यांना या पगारवाढीचा फायदा मिळणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली.
दर पाच वर्षांनी ही पगारवाढ होते. 2013 मध्ये वीज कर्मचार्‍यांना ही वाढ होणार होती, मात्र राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने वाढीचा निर्णय झाला नव्हता. मात्र, आता वीज कर्मचार्‍यांना एप्रिल 2013 पासून ही वाढ मिळणार आहे, अशी माहिती ऊर्जा विभागाकडून देण्यात आली.

पगार वाढीसाठी मंगळवारी ऊर्जा मंत्र्यांबरोबर महावितरण, पारेषण व निर्मितीमधील संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीतील चर्चेनंतर कर्मचार्‍यांना 25 टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.