आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर घाेटाळा: सरकारचा शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यांवरही डाेळा, व्यापाऱ्यांवर फौजदारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात तुरीच्या विक्रमी उत्पादनानंतर सरकारने तुरीला दिलेल्या ५०५० रुपये प्रतिक्विंटल हमीभावाचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या नावे तूर विकून घोटाळा केल्याचे समोर आल्याने सरकारने अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
 
हा घोटाळा शोधण्यासाठी जिल्हाधिकारी व बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर लक्ष ठेवण्याबरोबरच विशेष सूचना देण्यात येणार असल्याची माहिती पणन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी तुरीच्या उत्पादनाच्या आकड्यात मोठा घोळ असून यात घोटाळा झाल्याचे आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तूर विक्रीत ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर पणन विभागातील अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितले, दुसऱ्या कोणी आरोप करण्यापूर्वी सरकारने स्वतःच तूर खरेदीत घोटाळा झाल्याचे मान्य केले आहे.
 
सरकार सर्व तूर खरेदी केंद्रांवर लक्ष ठेऊन आहे. काही शेतकऱ्यांनी त्वरित पैसे मिळतात म्हणून ४४०० रुपये भावाने व्यापाऱ्यांना तूर विकली. या व्यापाऱ्यांनी ५०५० दराने तूर विकली आहे. राज्यात २०.३५ लाख टन तूरीचे उत्पादन झाल्याचे सांगितले जाते परंतु आम्ही सर्व्हे केल्यानंतर दिसून आले आहे की राज्यात १५.५० लाख टनाच्या आसपास तुरीचे उत्पादन झाले आहे. असे असताना जास्त तूर कशी आली या सर्व गोष्टींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
 
प्रत्येक तूर खरेदी केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्याची माहिती विशिष्ट पद्धतीने संगणकात नोंद केली जाणार आहे. यात शेतकऱ्याचे नाव, गट नंबर, सात बाराचा उतारा, त्याचे ठिकाण आणि त्याच्या बँक खात्याचा नंबर असणार आहे. यामुळे त्याने किती तूर लावली याची माहिती मिळणार आहे. त्यानंतर त्याच्या बँक खात्यावर लक्ष ठेवण्यास संबंधित बँकांच्या मॅनेजरला सांगितले जाणार आहे. एवढेच नव्हे तर या सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

व्यापाऱ्यांवर फौजदारी
शेतकऱ्याने पैसे जमा होताच पैसे काढले तर त्याची माहिती घेतली जाईल तसेच ऑनलाइन ट्रान्सफर केले तर ते कोणत्या अकाउंटला झाले आणि ते अकाउंट कोणाचे याची माहिती मिळवून जर तो व्यापारी असेल तर त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, मंत्री अर्जुन खोतकर कुटुंबीयांच्या तूर विक्रीची उच्चस्तरीय चौकशीची मागणी...
 
बातम्या आणखी आहेत...