आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Government Appoint Sindhutai Sakapal As Brand Ambesedore For Addiction Free

राज्य सरकारच्या व्यसनमुक्तीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी सिंधुताई सपकाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - व्यसनमुक्ती धोरणासाठी अखेर राज्य सरकारला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर सापडला. सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांची त्यासाठी निवड करण्यात आली, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली. गेले सहा महिन्यांहून अधिक काळ कोणीही सेलिब्रिटी पुढे येत नव्हते. अगदी सचिन तेंडुलकरलाही सरकारने निमंत्रण देऊन पाहिले पण त्याच्याकडून नकार आला होता.

क्रिमीलेअरची मर्यादा 6.5 लाख : क्रिमीलेअरची मर्यादा 6.5 लाख करण्याच्या केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून राज्यातर्फे होणार असून तसे परिपत्रक काढल्याचे मोघे यांनी सांगितले. क्रिमी लेअरबाबतचा निर्णय केंद्राने घेऊनही राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करत नसल्यामुळे गेले काही दिवस सरकारवर टीका झाली होती. अखेर या निर्णयाचे परिपत्रक काढण्यात आले.