आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य सरकारने सुट्या सिगारेट विक्रीवर आणली बंदी, पूर्ण पाकीट विकत घ्यावे लागणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रात राज्य सरकारने मंगळवारी सुट्या सिगारेट विक्रीवर बंदी आणली. म्हणजेच एकजरी सिगारेट घ्यायची असेल तर पूर्ण पाकीट विकत घ्यावे लागेल. राज्यात तब्बल ७० टक्के सिगारेट्सची सुटी विक्री होते.

या निर्णयानंतर हे पाऊल उचलणारे महाराष्ट्र पाचवे राज्य बनले. याअाधी चंदिगड, पंजाब, हिमाचल व राजस्थानात अशी बंदी आहे. राज्यात सार्वजनिक जागी आधीच तंबाखू चघळण्यावर बंदी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात ७०% सुट्या सिगारेटची विक्री होते. सुट्या सिगारेटवर वैधानिक इशारा नसल्याने परिणामांबाबत लोकांना सावध करता येत नाही. आरोग्य विभाग सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या, २-३ दिवसांत बंदीची अधिसूचना जारी होईल. त्याचे उल्लंघन केल्यास कोपटा कायद्यानुसार २ वर्षांचा तुरुंगवास वा ५ हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. पुन्हा हाच गुन्हा केल्यास ५ वर्षे कारावास व १० हजारांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. २००३ मध्ये केंद्राने हा कायदा लागू केला होता.

७०% कॅन्सर रुग्ण म्हणाले - सुटी सिगारेट विकत घेऊनच ओढली
बंदीचा निर्णय घेण्याआधी सातसदस्यीय समिती स्थापली होती. समितीने आपल्या अहवालात सांगितले महाराष्ट्रात ७० टक्के सिगारेट विक्री सुट्या स्वरूपात होते. समितीत असलेले टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले, संशोधनात बहुतांश तरुण सुटी सिगारेट विकत घेत असल्याचे समोर आले. त्यातील ज्यांना कर्करोग झाला त्यापैकी ९५ टक्के लोकांनी सांगितले की, आपल्याला किशोरवयातच सिगारेटचे व्यसन लागले होते. आपण एक-एक सिगारेट खरेदी करत होतो.

यासाठी बंदी गरजेची
>देशभरात दरवर्षी १०२ अब्ज सिगारेट्सची विक्री होते. म्हणजेच लोकसंख्येच्या ८१%
>गुड न्यूज : वर्षभरात तंबाखू उत्पादनांची विक्री १२% घटली.
>सर्वाधिक घसरण सिगारेट महागल्यानंतर मार्चमध्ये झाली.