आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Government Demands To Cancel Petition About School Bag

दप्तराच्या ओझ्याबाबतची याचिका रद्द करण्याची सरकारची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे अाेझे कमी करण्याबाबत शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला परिपत्रक पाठवले अाहे. तसेच अाेझे कमी करण्याबाबत उपाययाेजनाही सुरू केल्या अाहेत. त्यामुळे याबाबत दाखल असलेली याचिका रद्द करावी, अशी मागणी राज्य सरकारने उच्च न्यायालयात बुधवारी केली.

दरम्यान, सरकार यासंबंधीची अंमलबजावणी कशी करते हे पाहून त्यावर याचिकेबाबत निकाल देण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. राज्यातील शाळा आणि मुख्याध्यापकांना याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच याबाबत अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे ही याचिका रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.