आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा धार्मिक स्थळे ताेडण्यात राज्य सरकार अपयशी : हायकाेर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील बेकायदा धार्मिक स्थळे ताेडण्याबाबतचा अध्यादेश गेल्या वर्षी काढूनही त्यावर कार्यवाही करण्यात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरले अाहे, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी ताशेरे अाेढले.सामाजिक कार्यकर्ते भगवानजी रियानी यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी देताना न्यायमूर्ती अभय अाेक यांनी हे परखड मत मांडले. ‘सरकारने १८ नाेव्हेंबर २०१५ राेजी याबाबतचा अध्यादेश काढला हाेता. मात्र त्यावर ठाेस कारवाई झाली नाही. याचा अर्थ अाम्ही असा समजायचा की, सरकारचा हा निर्णय केवळ सार्वजनिक जागेवरील बेकायदा धार्मिक स्थळांबाबतच हाेता, खासगी जागेत बेकायदा उभारलेल्या धार्मिक स्थळाबाबत नव्हे?’ असा सवालही न्यायमूर्तींनी केला. दरम्यान, २००९ पासून अातापर्यंत राज्यभरात किती बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात अाली, याबाबतचा अहवाल राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांनी न्यायालयात सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...