आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Government Is In Favour For Bharat Ratna To Phule : CM Fadnavis

फुले दाम्पत्याला \'भारतरत्न\' मिळण्यासाठी प्रयत्न करीत राहणार- मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च असा 'भारतरत्न' पुरस्कार मिळावा यासाठी राज्य सरकार पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालया (सीएमओ)ने याबाबत टि्वटरवर माहिती दिली आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महान समाज सुधारक महात्मा फुले यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे जुलै महिन्यांतच केली होती. याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून फुले दांम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना लिहलेल्या पत्रात म्हटले होते की, महात्मा फुले हे एकोणिसाव्या शतकातील एक महान समाज सुधारक होते. शेतक-यांच्या हक्कासाठी त्यांनी अभूतपूर्व लढा दिला. याचबरोबर समाजातून वाईट गोष्टी, प्रथा, परंपरा नष्ट व्हाव्या यासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांच्या कार्याने महाराष्ट्र कायमच पुरोगामी विचारांनी कार्यरत राहिला.
सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करताना फडणवीसांनी पत्रात म्हटले होते की, देशात स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाई फुले यांनी रचला. महिलांमध्ये जनजागृती, त्यांचे शिक्षण, जातीप्रथेचे निर्मूलन यासाठी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लाऊन काम केले. त्यामुळे समाज घडविण्यात या दोघांचेही कार्य लक्षात घेता त्यांना 'मरणोत्तर भारतरत्न' पुरस्काराने गौरविण्यात यावे अशी विनंती करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे आपली मागणी केली होती. आताही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने फुले दांम्पत्याला मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार मिळावा याचा पुनरोच्चार केला आहे.
पुढे पाहा, फडणवीस यांचे ताजे टि्वट...