आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएसआरमधून गोळा करणार 700 कोटी; अर्थमंत्र्यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सरकारच्या विविध योजनांसाठी कंपन्यांकडून सीएसआरअंतर्गत पैसे मिळवण्याची योजना राज्य सरकारने आखली असून यासाठी विविध विभागाच्या सहा योजना निवडण्यात आल्या आहेत. या योजनांची संपूर्ण माहिती आठ जानेवारी रोजी उद्योगांच्या सीईओसमोर सादर करण्यात येणार अाहे. या कार्यक्रमास राज्यपालांसोबतच मुख्यमंत्रीही उपस्थित राहाणार आहेत. सीएसआरमधून साधारणतः ५०० ते ७०० कोटी रुपये जमण्याची शक्यता असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

राज्यात मुख्य कार्यालय असलेल्या प्रत्येक कंपनीला सामाजिक कार्यासाठी नफ्यातील दोन टक्के रक्कम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत देणे बंधनकारक आहे. अनेक कंपन्या अशी रक्कम बाजूला काढून ठेवतात. परंतु राज्य सरकारच्या योजनांना ही रक्कम प्राप्त होत नाही. गुजरातच्या धर्तीवर कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधी महाराष्ट्रात वळवावा यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले होते. राज्यपालांनी यासाठी पुढाकार घेतला होता. यासाठी दोन महिन्यांपूर्वी एक बैठक घेण्यात अाली हाेती.

या बैठकीनंतर पहिल्या टप्प्यात स्वच्छता अभियान, कौशल्य विकास, महिला आणि बाल कल्याण, अंगणवाड्या, जंगले आणि शिक्षण यासाठी हा सीएसआर वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या सर्व योजनांचे सादरीकरण विभागांनी पूर्ण केले आहे. या योजनांची माहिती जानेवारी रोजी मोठ्या कंपन्यांच्या सीईओंना देण्यात येणार अाहे.