आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांडपाण्याचा आता फेरवापर, राज्य नदी संवर्धन योजनेला मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरे आणि गावांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उद्योग आणि शेतीसाठी पुरवण्याच्या योजनेस मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य नदी संवर्धन योजना नदीकाठावरील ड वर्ग महानगरपालिका, नगरपालिका आणि 15 हजारांवरील लोकसंख्येच्या गावात राबविण्यात येईल.यासाठी राज्य शासन 80 टक्के, तर स्थानिक स्वराज्य संस्था 20 टक्के खर्च करेल.
धानाला 200 बोनस मिळणार
आधारभूत किंमत खरेदी योजनेत 2013-14 खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानासाठी केंद्राने ठरवलेल्या दराच्या अतिरिक्त 200 रुपये बोनस देण्यात येईल.
वैद्यकीय अध्यापकांना नियुक्ती
शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयातील व रुग्णालयातील मानसेवी (ऑनररी) वैद्यकीय अध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे असे कायम ठेवण्याचा, मात्र त्यापुढे त्यांची सेवा नियमित करारावर 70 वर्षे वयापर्यंत घेणार.
अनुसूचित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यापीठांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 11 महिन्यांच्या कालावधीसाठी एकूण 235 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी हे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी 1.83 कोटी रुपये वार्षिक खर्च होईल.
राहुरीला रेत प्रयोगशाळा उभारणार
राष्‍ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या मदतीने नगर जिल्ह्यातील राहुरी येथे गोठीत रेत प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 250 एकर जमीन नाममात्र दराने 30 वर्षांसाठी दिली जाईल. मंडळाच्या डेअरी सर्व्हिसेसमार्फत या प्रकल्पात 100 कोटींची गुंतवणूक करून 200 लोकांना यामध्ये रोजगारही मिळेल. राज्यात 105 लक्ष गोठीत रेतमात्रांची आवश्यकता असून पुणे, नागपूर व औरंगाबादच्या प्रयोगशाळांमधून प्रतिवर्षी 21 लाख गोठीत रेतमात्रांचे उत्पादन करण्यात येते.