आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावसाहेब दानवेंच्या विधानाबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी: राधाकृष्ण विखे पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांप्रति केलेला शिवराळ भाषेचा वापर म्हणजे कोडगेपणाचे प्रतीक असून या विधानाबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे म्हणाले, शेतकऱ्यांचा सन्मान करता येत नसेल तर किमान अवमान तरी करू नये.  

फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात बळीराजाचे खच्चीकरण सुरू आहे. शिवीगाळ करण्याची कसर तेवढी शिल्लक होती. तीदेखील भाजप प्रदेशाध्यक्षांनी भरून काढली. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याचे सांगून नवनवीन घोषणा करत आहेत. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांच्या भावनांना ठेच लावणारी विधाने करत असल्याचे ते म्हणाले.या दुतोंडी भूमिकेतून भाजपची शेतकऱ्यांप्रतिची अनास्था दिसून येते. शेतकऱ्यांचा घोर अवमान करणाऱ्या या विधानाबाबत मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका जाहीर केली पाहिजे. मुख्यमंत्री मौन बाळगून राहिले तर ते सहमत असल्याचे स्पष्ट होईल.
बातम्या आणखी आहेत...