आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्‍य सरकारच्‍या अर्थसंकल्पाचा फक्त 45% खर्च, योजनांवर विपरीत परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र सरकारने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पातील एकूण अर्थसंकल्पीय तरतुदींच्या केवळ ४५ टक्केच खर्च केला आहे. वित्त विभागाने जारी केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.
 
राज्य सरकारचा सन २०१६-१७ चा अर्थसंकल्प ३.०४ लाख कोटी रुपयांचा आहे. मात्र, सर्व विभागांना प्रत्यक्षात २.०६ लाख कोटी रुपयांचाच निधी प्राप्त झाला. आकडेवारीनुसार एकूण २.०६ लाख कोटी रुपयांपैकी १.३८ लाख कोटी रुपये विविध योजनांवर खर्च करण्यात आले. 

हा खर्च एकूण अर्थसंकल्पीय तरतुदींच्या ४५.६३ टक्केच आहे. निश्चित असे नियोजन असल्याशिवाय निधी आहे म्हणून खर्च करण्याची काहीही गरज नसल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. मुनगंटीवार म्हणाले की, निधीची उपलब्धता असूनही तो खर्च करण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. आम्ही आर्थिक शिस्तीमुळे या वेळी पैशाची बचत केली आहे. चालू आर्थिक वर्षाचा म्हणजेच २०१७-१८ चा अर्थसंकल्प १८ मार्च रोजी सादर हाेईल.

योजनांवर विपरीत परिणाम  
निधीच्या कमी खर्चामुळे सरकारच्या योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होऊ शकलेली नाही, असे वित्त विभागातील अधिकाऱ्याने मान्य केले.
बातम्या आणखी आहेत...