आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Government Will Launch Amchi Vidhansabha Chennel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य सरकार काढणार ‘आमची विधानसभा’ चॅनल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधिमंडळाचे कामकाज थेट राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार लवकरच ‘आमची विधानसभा’ हे नवे चॅनल सुरू करणार आहे. मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने ही माहिती दिली.

आपले लोकप्रतिनिधी विधिमंडळात कसे काम करतात, याबाबत सर्वांनाच माहिती हवी असते. आमदारांनी उपस्थित केलेले प्रश्न, एखाद्या विषयांवरील गंभीर चर्चा या जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाहीत. तसेच अनेक वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रे झालेल्या सकारात्मक चर्चांना योग्य ती प्रसिद्धी देत नाहीत. या आणि इतर कारणांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे शासनाने असे चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘आमची विधानसभा’ चॅनलसाठी सरकारने अंतिम मसुदा तयार केला असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व विधान परिषद अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी त्याचे सादरीकरणही पाहिले आहे. या चॅनलसाठी जवळपास 50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या चॅनलसाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी नुकतीच लोकसभा टीव्हीच्या कार्यालयाला भेट देऊन माहितीही घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.