आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी गुन्हा, राज्य सरकार कायदा करणार : मुख्यमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - राज्यात शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणे अाता गुन्हा ठरणार अाहे. त्यासंदर्भात राज्य सरकार कायदा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. गटशेतीच्या आढावा बैठकीत ते बाेलत हाेते.  

मुख्यमंत्री म्हणाले की, गटशेती ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहे. गट तयार झाल्यावर त्यांच्या माध्यमातून भौगोलिक परिस्थितीनुसार कृषी उत्पादन घ्यावे. या उत्पादनाला पूरक असे ‘एकाच छत्राखाली पायाभूत यंत्रणा’ उपविभागीय स्तरावर निर्माण करावी. जेणेकरून शेतकऱ्याच्या कुठल्याही समस्येचे निवारण या ठिकाणी करता येऊ शकेल. गोदाम, शीतगृह यांची उपलब्धता उपविभागीय स्तरावर निर्माण झाल्यास नाशवंत कृषी उत्पादनाला त्याचा फायदा होऊ शकेल.’ दरम्यान,  राज्यात गटशेतीला चालना मिळण्याकरिता तयार करण्यात आलेल्या धोरणालाही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आले. या धोरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले अाहेत. उसाचे क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याकरिता व्याज सवलत योजनेलादेखील या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आले.   
 
या वेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी राज्यात गटशेतीचा प्रयोग यशस्वीरीत्या राबविणाऱ्या संस्था, स्वयंसेवी समूह शेती गट, इस्रायल जेथ्रो संस्था, इतर शेतकरी कंपन्या यांचे गटशेतीबाबत सादरीकरण झाले. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...