आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Govt. Published Tendors Advt. For New Mumbai Airport

नवी मुंबई विमानतळासाठी सरकारने जागतिक कंपन्यांकडून निविदा मागवल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अर्हता विनंती प्रस्तावासाठी जागतिक कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. याबाबतची जाहिरात सिडकोने आज प्रकाशित केली आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जागतिक सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ असेल. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी याची निर्मिती आवश्यक आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळची प्रतिवर्ष प्रवासी क्षमता 40 दशलक्ष पर्यंत वाढविली जाऊ शकते. परंतु 2030 वर्षात या क्षेत्रातील वाहतुक क्षमता 100 दशलक्ष प्रवासी प्रतीवर्ष एवढी होणार आहे. त्यामुळे जवळपास 60 दशलक्ष क्षमतेच्या नवी मुंबई विमानतळाची गरज निर्माण झाली आहे. नवी मुंबई विमानतळासाठी आवश्यकत्या सर्व मान्यता आणि परवाने सिडकोने प्राप्त केले आहेत. अर्हता प्रस्ताव निविदा सादर करण्यासाठी 90 दिवसांनी मुदत देण्यात आली आहे.
निविदाकर्त्यांची निवड करण्याची प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. यातून पात्र ठरलेल्या कंपनीला किंवा कंपनीसमुहाला दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेसाठी निमंत्रीत करण्यात येईल. विमातळाच्या विकासाचे काम आराखडा, विकास, अर्थसहाय्य कार्यान्वयन आणि हस्तांतरण या तत्त्वावर देण्यात येईल.