आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Govt. Will Help On Farmers From 5 Th To 15 April

गारपीटग्रस्तांना 15 एप्रिलपर्यंत नुकसान भरपाई, राज्याची कोर्टाला माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या महिन्यात महाराष्ट्रात पडलेल्या तुफान गारपीटाने नुकसान झालेल्या शेतक-यांना पहिल्या टप्प्यातील मदत येत्या 5 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत देण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारने कोर्टात दिली आहे. त्यासाठी 2 एप्रिलपूर्वी राज्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पीकांचे पंचनामे पूर्ण केले जातील असे सरकारने म्हटले आहे.
गारपीट होऊन महिन्याभराचा कालखंड होत आला. केंद्र सरकारने सुमारे 4 हजार कोटींचे पॅकेज दिले तरी शेतक-यांना भरपाई मिळण्यास विलंब का होत अशा आशयाची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्याबाबत कोर्टाने राज्य सरकारने विचारणा केली असता सरकारने कोर्टाला हे लिहून दिले आहे.
राज्य सरकारच्यावतीने मुख्य सचिव यांनी याबाबत कोर्टाला दिेलेल्या माहितीत म्हटले आहे, आचारसंहितेमुळे तत्काळ मदत अथवा भरपाई देण्यास विलंब झाला. असे असले तरी 2 एप्रिलपर्यंत सर्व नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पीकांचे पंचनामे करून 5 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यात शेतक-यांना भरपाई दिली जाईल. 15 एप्रिलपर्यंत पहिल्या टप्पा पूर्ण केल्यानंतर याबाबत संपूर्ण माहिती व आढावा घेऊन अंतिम भरपाई दिली जाईल. दरम्यान, राज्य सरकारने नेमके मतदानाच्यावेळी शेतक-यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. गारपीटीचा सर्वात जास्त तडाखा विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला होता. या परिसरात 10 एप्रिल व 17 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदानाच्या काही दिवस अगोदर म्हणजे 5 ते 15 एप्रिलदरम्यान मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मतदारांचा रोष आपल्या माथी पडू नये म्हणून सरकार खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे.