आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Govt. Ready To Give Maratha & Muslim Cast Reservation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NEWS @ MH: मराठा समाजाला 12 तर मु्स्लिमांना 4.5 टक्के आरक्षणाची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने विधानसभेच्या तोंडावर नाराज झालेल्या मराठा समाजाला व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आली आहे. मराठा समाजाला 10 ते 12 टक्के तर, मुस्लिमांना 4 ते 4.5 टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेसचे नेते ए के. अॅन्टोनी आणि अहमद पटेल यांची भेट घेतली. यात आगामी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी विविध समाजाच्या घटकांना आरक्षण देणे व एलबीटी रद्द करणे अथवा तत्सम पर्याय देणे आदी बाबींवर चर्चा झाली. पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने हे विषय तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी पवारांनी या दोन नेत्यांकडे केल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून समजते आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणे समितीने मराठा समाजाला 16 ते 20 टक्केपर्यंत आरक्षण देण्याचे नमूद केले आहे. याचबरोबर मुस्लिम समाजालाही 8 टक्के आरक्षण देण्याचे समितीने नमूद केले आहे. राज्यात 32 ते 35 टक्के मराठा समाज तर 10.5 टक्के मुस्लिम समाज असल्याचे शासकीय आकडेवारी सांगत आहे. अशा स्थितीत मराठा समाजाला 10 ते 12 टक्के व मुस्लिमांना 4 ते 4.5 टक्के आरक्षण देण्याचा विचार पवारांनी मांडला आहे. त्याला काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आगामी एक-दोन आठवड्यात सर्व शासकीय व कायदेशीर सोपस्कर पार पाडल्यानंतर त्याची घोषणा होऊ शकते. मराठा व मुस्लिम समाजाला स्वतंत्र (ओबीसी प्रमाणे) आरक्षण देण्यात येणार आहे. नोकरी व शिक्षण या दोन बाबींसाठी याचा या समाजाला फायदा होणार आहे.
पुढे वाचा, नानौक वादळामुळेच नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांचा जोर ओसरला...
(फाईल फोटो)