आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Govt. Medical Officer Strike Taken Back After 1 Week

हुश्श्य, अखेर सातव्या दिवशी डॉक्टरांचा संप मागे, उद्यापासून सेवेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: डॉक्टरांचा संप मिटला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते मोसंबीचा रस घेऊन 'मॅग्मो'चे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी उपोषण संपवले आणि आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.)
मुंबई- विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या राज्यातील राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाच्या (मॅग्मो) डॉक्टरांनी आपला संप अखेर सातव्या दिवशी सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विनंतीनंतर मागे घेतला. येत्या काही दिवसात कॅबिनेट बैठकीत तुमच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतर संप मागे घेतल्याचे मॅग्मोचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी सांगितले. डॉक्टरांनी संप मागे घेतल्यामुळे राज्यातील लाखो रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
आठ तास काम, सहावा वेतन आयोग जानेवारी 2006 पासून लागू करावा, तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती असणार्‍या डॉक्टरांना पूर्वलक्षी प्रभावाने फायदे द्यावेत आदी प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या संघटनेने (मॅग्मो) संपाची हाक दिली होती. यात राज्यातील सुमारे 5 हजार 310 डॉक्टर सहभागी झाले होते. या संपामुळे 4 हजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आरोग्य सेवा कोलमडली होती.
‘डॉक्टरांच्या योग्य त्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. तातडीने संप मागे न घेतल्यास संपावर गेलेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांवर ‘मेस्मा’नुसार (महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा) कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी दिल्यानंतरही मॅग्मोने जुमानले नव्हते. अखेर सोमवारी मुख्यमंत्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मॅग्मोच्या प्रतिनिधींची भेट घेऊन यात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे मॅग्मोचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी माहिती दिली.
राज्य शासनाकडून लेखी आश्वासन मिळूनही मागण्यांची पूर्तता केली नसल्याने राज्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या संघटनेने (मॅग्मो) आपल्या प्रलंबित 11 मागण्यांसाठी 1 जुलैपासून ('डॉक्टर्स डे' च्या निमित्ताने) बेमुदत राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले होते. राज्यातील वैद्यकीय अधिका-यांच्या विविध प्रश्नांबाबत शासनाकडून टोलवाटोलवी होत असल्यानेच सरकारला हिसका दाखविण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता असे मॅग्मोने म्हटले होते. मग आता यापेक्षा अधिक काय मिळवले इसा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेली आठ दिवस संपावर जाऊन संपूर्ण राज्यातील खासकरून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ठप्प झाली होती. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील रूग्णांना बसला. त्यामुळे कोणताही हेतू साध्य झाला नसताना केवळ ग्रामीण रुग्णांची पिळवणूक करण्यात डॉक्टरांना यश मिळाल्याचे मानण्यात येत आहे.
पुढे वाचा, काय होत्या व आहेत वैद्यकीय अधिका-यांच्या मागण्या?...