आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Govt. Provides Subsidy For Poor & Suicide Farmers Family For Shettale

आता मागेल त्याला शेततळे, दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेततळे (फाईल फोटो) - Divya Marathi
शेततळे (फाईल फोटो)
मुंबई- राज्यात मागील काही वर्षापासून सातत्याने पडत असलेल्या दुष्काळावर मात करण्यासह शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी संरक्षित आणि शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य सरकार यापुढे मागेल त्याला शेततळे योजना मंजूर करणार आहे. या योजनेत आकारमानानुसार शेतक-यांना अनुदान दिले जाईल. शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात सरकार थेट जमा करणार आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्यावर्षीपासून विविध दुष्काळी भागांचा दौरा करत आहेत. या दरम्यान शेतकऱ्यांनी शेततळे उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी आणि राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे आणि त्यातून संरक्षित व शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी शेततळी हा उपयुक्त पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे.
या शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडित कालावधीत फायदा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उत्पादनात काही प्रमाणात शाश्वतता आली होती. या वर्षात राज्यात सरासरीच्या तुलनेत 60 टक्के पर्जन्यमान झाले आहे. अनेक भागात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेततळी महत्त्वपूर्ण ठरु शकत असल्याने शासनाने मागेल त्याला शेततळे या योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. टंचाईग्रस्त भागातील गावांना प्राधान्याने स्थान देण्यात आले असून, तेथे 51 हजार 500 इतकी शेततळी मंजूर करण्यात आली आहे.
आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्य-
दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती व ज्या शेतकरी कुटुंबात आत्महत्या झाली आहे अशांच्या वारसांची प्राधान्याने निवड केली जाणार आहे. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर शेततळ्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्येष्ठता यादीतून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
पुढे वाचा, शेततळ्याच्या आकारमानानुसार मिळणार पैसे...