आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Govt Are Serious About Water Scarcity & Drought In Maharashtra

दुष्काळाबाबत राज्य सरकार दक्ष : टंचाई उपाय योजनांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टंचाईग्रस्त क्षेत्रात टँकर सुरु करण्याचे अधिकार तहसिलदारांना देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. टँकरची बिले वेळेवर देण्याचे यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. टंचाईवरील सर्व उपाययोजनांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. हे उपाय योजता राबवताना इतर कोणत्याही बाबी विचारात घेतली जाणार नाहीत.
राज्यातील जलाशयात 19 टक्के साठा असून 1464 टँकर्सद्वारे 1359 गावांना आणि 3317 वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. 35 पैकी 34 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे 1 जुलै 2014 ते 30 जून 2015 पर्यंतचे त्रैमासिक कृती आराखडे तयार करण्यात येणार आहेत. पहिला आराखडा 5 दिवसात सादर करावा आणि पुणे, नाशिक, औरंगाबाद या विभागातील पाण्याचा साठा अग्रहक्काने पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात यावा, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले.
राज्यात 30 जून पर्यंत 58.50 मी.मी. म्हणजेच सरासरीच्या 26.30 टक्के पाऊस झाला आहे. जून अखेर सरासरीच्या तुलनेत पडलेला पाऊस पुढील प्रमाणे- 355 तालुक्यांपैकी 194 तालुक्यात 0 ते 25 टक्के, 123 तालुक्यात 25 ते 50 टक्के, 28 तालुक्यात 50 ते 75 टक्के, 7 तालुक्यात 75 ते 100 टक्के आणि 3 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

केवळ 16 जिल्ह्यात 25 टक्के पाऊस- ठाणे, रायगड, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत 0 ते 25 टक्के तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, परभणी, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत 25 ते 50 टक्के पाऊस झाला आहे. केवळ सांगलीत 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
(संग्रहित छायाचित्र)