आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Govt Cabineet Meeting, Electricity Rate Cut Upto 20 %

कृषी, उद्योगांच्या वीजदरात 20 टक्के कपात, अनधिकृत बांधकामाबाबत समिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत कृषी, हातमाग व उद्योग क्षेत्रातील वीज दरांत 20 टक्के कपात करण्यात आली आहे. याचबरोबर ठाणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षपदाखाली एक समिती नेमण्यात आली आहे. असे असले तरी घरगुती वीज ग्राहकांना यात कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांनी घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात करावी यासाठी खासदार प्रिया दत्तसोबत मुंबईत आंदोलन केले होते. मात्र, राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
दरम्यान, संजय निरूपम यांनी सांगितले, की राज्य सरकारने याबाबत का निर्णय घेतला नाही याची माहिती घेऊन पुढे काय व कसे आंदोलन करायचे याबाबत विचार करणार आहे. घरगुती ग्राहकांना दिलासा देण्याची गरज होती. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आणखी एक समिती कशासाठी नियुक्ती केली आहे, असा प्रश्न विचारत याप्रश्नी खूप उशीर होत असल्याचे मत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सरकार वारंवार हा प्रश्न पुढे ढकलत असल्याने मी माझी व्यक्तिगत नाराजी कळवित आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले.