आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप व रब्बीसाठी सरकार शेतक-यांना देणार 2172 कोटी रुपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- खरीप व रब्बी हंगामात राज्यातील शेतक-यांना दुष्काळी परिस्थितीशी सामना करावा लागल्यामुळे राज्य सरकार शेतक-यांना सुमारे 2172 कोटी रुपयांचा रोख निधी वाटप करणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे दुष्काळ निवारणासाठी रक्कम मागितली होती. त्यातील केंद्राने मंजूर केलेली सर्व रक्कम (2172) कोटी रुपये देण्यात येणार आहे. ही मदत 3 हजार रुपये हेक्टरी प्रमाणे शेतीपिकांना व 8 हजार रुपये फळपिकांना देण्यात येणार आहे. मात्र ज्या गावांत 50 पैसेपेक्षा कमी आणेवारी लावण्यात आली आहे अशाच भागांना व तेथील शेतक-यांना मिळणार आहे. याचबरोबर अत्यल्प व अल्प भूधारकांच्या
पूर्ण क्षेत्र व इतर शेतक-यांना 1 हेक्टर क्षेत्रासाठी मदत देण्यात येणार आहे.

नंदूरबारमध्ये कृषी महाविद्यालयाला परवानगी- आदिवासी युवक व युवतींसाठी कृषी पदवीधर अभ्यासक्रमांची सुविधा निर्माण करण्याची गरज ओळखून नंदूरबार येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हे कृषी महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठातंर्गत असेल. यासाठी लागणारा निधी
आदीवासी उपयोजनेतून देण्यात येईल. नंदूरबार येथील या नव्या कृषी महाविद्यालयात 39 शिक्षक व 21 शिक्षकेत्तर अशी 60 पदे निर्माण करण्यात येतील. या महाविद्यालयामुळे आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी आदिवासींना कृषी शिक्षण आणि सल्ला देणेही शक्य होईल. यामध्ये कृषी विद्या, वनस्पती शास्त्र, कृषी रसायन व मृदूशास्त्र त्याचप्रमाणे पशुविज्ञान, कृषी अभियांत्रिकी असे 10 अभ्यासक्रम शिकविण्यात येतील. या महाविद्यालयातील 80 टक्के आरक्षण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात येईल.