आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Govt Decision For Retried Employee Latest News In Marathi

निवृत्त अधिकारी, कर्मचारी पुन्हा सेवेत; 70 वर्षांपर्यंत मिळणार काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा विशिष्ट कामांसाठी करार पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे. अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे क्षेत्रनिहाय पॅनेल तयार करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना कमाल ४० हजार रूपयांपर्यंत मानधन मिळणार असून वयाची अट कमाल ७० पर्यंत असेल. स्वच्छा निवृत्ती घेतलेल्या विभागीय चाैकशी चालू असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मात्र विचार केला जाणार नाही.

िवशिष्ट कामासाठी विशेष अर्हता तसेच संबंधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. हे करताना नेहमीच्या नियमित मंजूर पदांवर करार पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार नसून ही पदे सेवा प्रवेश नियमानुसारच भरली जातील. त्यामुळे सरकारमधील नियमित पदभरती प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. विशेष कौशल्य धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी मंजूर पदसंख्येच्या कमाल १० टक्के पदे भरण्याबाबत जी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, त्या मर्यादेतच करार पद्धतीने नियुक्ती करता येऊ शकेल.

करार पद्धतीने नियुक्त्या करण्याचे प्रस्ताव तयार करताना कामाचे स्वरूप, आकस्मिकता, सार्वजनिक हित या बाबी विचारात घेण्यात येणार आहेत. या नियुक्त्यांमुळे सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही. या नियुक्तीसाठी निश्चित केलेल्या विशिष्ट कामाचे स्वरूप आणि व्याप्ती विचारात घेता काम पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित केला जाईल. त्यानुसार जास्तीत जास्त एका वर्षासाठी नियुक्ती देण्यात येणार असून गरज पडल्यास दरवर्षी नूतनीकरण केले जाईल.

हमीपत्र देणे अावश्यक
नियुक्त करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्याकडे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे असून काम करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. नियुक्तीच्या कालावधीत संबंधित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंिधत व्यक्तीची राहणार असून याबाबत त्याच्याकडून हमीपत्र घेण्यात येईल.