आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरात सर्किट बेंच स्थापण्याचा राज्य सरकारचा निर्णय, पुण्याचाही प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांकरिता मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) कोल्हापूर येथे स्थापन करण्यास मान्यता देण्यात यावी, अशी शिफारस मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती यांना करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
त्याचप्रमाणे पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे आणखी एक फिरते खंडपीठ स्थापन करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती देखील उच्च न्यायालयास करण्यास मान्यता देण्यात आली.

कच्च्या साखरेच्या निर्यातीस प्रति मेट्रिक टन 1 हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदत
राज्यातील उत्पादित कच्च्या साखरेच्या 15 ऑक्टोबर 2014 ते सप्टेबर 2015 या कालावधीतील निर्यातीसाठी एक हजार रुपये प्रति मेट्रिक टन प्रोत्साहनपर मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शासनावर सुमारे 80 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
शासनामार्फत देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन रकमेतून शेतकऱ्याच्या रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम प्रथम प्राधान्याने देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रोत्साहन रकमेतून कारखान्यांकडून शासनास येणे असलेली थकबाकी प्राधान्याने वजा केली जाईल. राज्यातील उत्पादित कच्च्या साखरेपैकी अंदाजे 8 लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी अंदाजे 80 कोटी रुपयांचा भार शासनावर पडणार आहे.
केंद्र शासनाच्या अधिसूचनेच्या धर्तीवर राज्यातील साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या हंगाम 2014-15 मध्ये निर्यात केलेल्या कच्च्या साखरेस व इंपोर्ट इनव्हॅलिडेशन ऑफ ॲडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीम (Import Invalidation of Advance Authorisation Scheme) अतंर्गत पुरवठा केलेल्या स्थानिक कच्च्या साखरेस अधिसूचनेत नमूद अटी व शर्तीस अधीन राहून प्रोत्साहन मदत मंजूर करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...