आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: विधानभवनातील दुस-या मजल्यावरून उडी मारून कर्मचा-याची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील विधानभवनाच्या इमारतीच्या दुस-या मजल्यावरून उडी मारून एका कर्मचा-याने आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. अर्जून कचरे असे या कर्मचा-याचे नाव असून, तो विधानभवनातील अग्निशमन दलाचा कर्मचारी आहे.
गेली दोन महिने पगार न झाल्याने कचरे अस्वस्थ होता. त्यामुळे निराशेतून त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कचरेच्या सहका-यांनी तो मागील दोन महिने पगार न झाल्याने तणावात असल्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याच्या शक्यतेला पुष्टी मिळण्याची शक्यता आहे.
अर्जून कचरे याने आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विधानभवनाच्या दुस-या मजल्यावरून उडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जून कचरेच्या खिशात अथवा इतरत्र अद्याप कोणत्याही प्रकारची सुसाईट नोट मिळाली नाही. त्यामुळे पोलिस पडून मृत्यू झाला की आत्महत्या केली याचा तपास करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे विधानभवन परिसरात खळबळ माजली आहे.
बातम्या आणखी आहेत...