आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंना सरकारने बहाल केली \'झेड\' दर्जाची सुरक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य सरकारने वाय ऐवजी आता झेड सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. राज यांच्या सुरक्षेत वाढ करीत मंगळवारपासूनच ही सुरक्षा बहाल करण्यात आली.
राज्यातील महत्त्वात्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पुरविण्यात येत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा सरकारच्या सुरक्षा आढावा समितीने मंगळवारी घेतला. त्यावेळी राज याची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गृहविभागाच्या वतीने राज यांना तत्काळ झेड सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आली. राज यांना आतापर्यंत वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येत होती.