आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hema Malini Got Rs 70 Crore Land For Rs 1.75 Lakh: RTI

हेमामालिनींना ७० कोटींचा भूखंड १.७५ लाखांत दिला, माहिती अधिकारातून माहिती उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री हेमामालिनी यांना मुंबईतील आेशिवरा भागात डान्स अकादमी उघडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ७० कोटींचा भूखंड अवघ्या १.७५ लाख रुपयांत दिल्याची माहिती आरटीआयमध्ये समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने सुधरित धोरणांतर्गत हेमामालिनींना डान्स अकादमीसाठी २००० चौरस मीटरचा भूखंड ८७.५० रुपये चौ.मी. दराने १.७५ लाखांत दिला. हेमांनी या भूखंडासाठी आधीच दहा लाख रुपये भरले होते. म्हणजे सरकारला त्यांचेच ८.२५ लाख रुपये परत करायचे आहेत.
धोरण बदलले तरी...
आधीच्या आरटीआय अर्जात हेमांना ही जमीन ३५ रुपये चौ.मी. दराने ७० हजारांत दिल्याचे उघड झाले होते. त्यावर वाद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी खासगी संस्था व कलाकारांना भूखंड वाटप धोरणात दुरुस्तीचे आदेश दिले होते.