आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त मजकुराला लाइक करणार्‍यांवरही गुन्हे : आर.आर. पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सोशल मीडियावर महापुरुषांची बदनामी करून समाजात तेढ निर्माण करणार्‍यांविरोधात राज्य सरकारने कठोर उपाययोजना करण्याची भूमिका घेतली आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणारे व तो लाइक करणार्‍यांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी ही माहिती दिली. फेसबुक प्रकरणी वादग्रस्त मजकूर अपलोड केल्याच्या संशयावरून पुण्यातील मोहसीन शेख या अभियंत्याला हिंदू राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. यात त्याचा मृत्यू झाला. चौकशीत शेख निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील आरोपी धनंजय देसाईवर कडक कारवाई करण्याबरोबरच हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घालण्याच्या शक्यताही राज्य सरकार तपासून पाहत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोणत्याही परिस्थितीत पोलिसांना कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आदेश देण्यात आल्याचे पाटील म्हणाले.