आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिअर बारचे उद‌्घाटन केल्याने गृह राज्यमंत्री राम शिंदे वादात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अहमदनगर जिल्ह्यात बिअर बारचे उद‌्घाटन केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री राम शिंदे वादात अडकले आहेत.
गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी अहमदनगर जिल्ह्यात एका बिअर बारचे उद‌्घाटन केले. कार्यक्रमाला अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर भाजपचे आमदारही उपस्थित होते. काँग्रेसने या प्रकरणी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पक्षाचे प्रवक्ता सचिन सावंत म्हणाले, आता भाजपमध्ये ‘राम’ उरलेला नाही. त्यामुळे मंत्री स्वत: बिअर बारच्या उद‌्घाटनासाठी जात आहेत.
त्यावर शिंदे म्हणाले, नियम तपासल्यानंतरच मी समारंभासाठी गेलो. केसरकर यांनीही ‘मी फॅमिली रेस्टाॅरंटच्या उद‌्घाटनाला गेलो होता,’ असे स्पष्टीकरण दिले आहे.

टाळायला हवे होते
> मी परवाना देणारा मंत्री आहे. पण राम शिंदे यांनी उद‌्घाटनाला जाणे टाळले असते तर बरे झाले असते. -एकनाथ खडसे, महसूलमंत्री