आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहराज्यमंत्री पाटील यांच्या मुलाला दहावीत मिळाले 99.20 टक्के गुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशपाल पाकल (डावीकडे) आणि धनंजय सहस्त्रबुद्धे - Divya Marathi
यशपाल पाकल (डावीकडे) आणि धनंजय सहस्त्रबुद्धे
अकोला- राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत 99.20 टक्के मिळवले आहेत. रणजित पाटील यांचा मुलगा शर्व पाटील यंदा दहावीत होता. त्याने 500 (बेस्ट ऑफ फाईव्ह) पैकी 496 गुण मिळाले आहेत. शर्वने अमरावती बोर्डाच्या अंतर्गत अकोल्यातून दहावीची परीक्षा दिली होती. शर्व अकोल्यातील माऊंट कार्मेल स्कूलचा विद्यार्थी आहे.
अकोल्यातील आणखी दोन मुलांनी 99.40 टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यशपाल मंगलसिंह पाकल आणि धनंजय सहस्त्रबुद्धे अशी त्यांची नावे आहेत. दोघेही जवळचे मित्र आहेत व एकाच वर्गात शिकत होते. या दोघांनाही भविष्यात डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायची आहे. या दोघांनी कोणताही खासगी क्लास लावला नव्हता हे विशेष.
पुढे वाचा, यशपाल व धनंजय याच्याबाबत...
बातम्या आणखी आहेत...