आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Home Minister Rpn Singh Attacks On Modi Overon Rahuls Critics

\'...मग नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंना \'शहजादे\' का म्हणत नाहीत?\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसमध्ये फक्त घराणेशाहीला महत्त्व आहे व त्यांनाच मोठी पदे मिळतात म्हणून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना आपण 'शहजादे' म्हणतो. काँग्रेसने वंशवाद किंवा घराणेशाही सोडावा, मग आपण राहुलना शहजादे म्हणणे सोडू, अशी टीका करणा-या नरेंद्र मोदींना काँग्रेसने उत्तर दिले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंह यांनी मोदींना प्रश्न विचारला आहे की, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षाचे नेतृत्त्व आलेल्या उद्धव ठाकरेंना तुम्ही शहजादे का म्हणत नाही. ज्या एनडीएचे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत त्या एनडीत असलेल्या प्रकाशसिंग बादल यांचे चिरंजीव सुखबीरसिग बादल यांना मोदी शहजादे का म्हणत नाहीत.
सिंह यांनी मोदींवर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व दिले गेले आहे. तसेच पंजाबमध्ये सत्तेवर असलेल्या प्रकाशसिंग बादल यांनी आपल्या मुलाला पक्षाचे उपाध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. अशा स्थितीत फक्त काँग्रेसमध्य घराणेशाही आहे असे म्हणणा-या मोदींना शिवसेना व अकाली दलमधील घराणेशाही दिसत नाही का? आणि जर दिसत असेल तर उद्धव ठाकरे व सुखबीरसिंह यांना शहजादे का म्हणू नये, अशी टीका करीत प्रत्युत्तर दिले आहे.