आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Homeminister Shinde Inaguaration Beer Bar At Nagar

गृहराज्यमंत्री शिंदेंच्या हस्ते बिअर बारचे उद्घाटन, सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी नगर-पुणे महामार्गावरील बिअर बार रेस्टांरंटचे उद्घाटन केले. शिंदे यांच्या हस्ते शनिवारी रात्री उद्घाटन झाले त्यावेळी या समारंभाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर, काँग्रेसचे आमदार सुधीर तांबे, राष्ट्रवादीचे माजी आमदार यांनी हजेरी लावली. दरम्यान, राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी बिअर बारच्या उद्घाटनाला जाणे कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
याबाबतची माहिती अशी की, नगरजवळ पुणे-नगर रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या कीर्ती फॅमिली रेस्टॉरंट आणि परमीट रूमचे शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामुळे सामाजिक स्तरातून शिंदे व इतर लोकप्रतिनिधींवर टीका होऊ लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिंदे यांच्या कृतीवर टीका केली आहे.
राज्यात दारूबंदी चळवळ सुरु आहे. नगर जिल्ह्यातही आंदोलनी झाली आहेत. अण्णा हजारेंचा वारसा लाभलेल्या या जिल्ह्यात गृहराज्यमंत्र्यांनी बारचे उद्घाटन करणे हे नैतिकतेला न शोभणारे असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. भाजपचा एक मंत्री आपल्या जिल्ह्यात दारूबंदी व्हावी म्हणून मंत्रीपद सोडायला निघाले होते तर भाजपचाच दुसरा मंत्री परमिट रूमचे उद्घाटन करीत आहेत. हे योग्य नाही. भाजपचे नेते व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही शिंदे यांनी परमिट रूमचे उद्घाटन टाळले असते तर बरं झाले असते अशी प्रतिक्रिया दिली आहे.
गृहराज्यमंत्री राम शिंदे व दीपक केसरकर यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही एका फॅमिली रेस्टांरंटचे उद्घाटन करण्यास गेलो होतो. या हॉटेलचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. पूर्वी या हॉटेलमध्ये परमिट रूमची परवानगी होती. आता या हॉटेलमध्ये फॅमिली रेस्टांरंटची सोय करण्यात आली आहे व त्याचेच आम्ही उद्घाटन केले. शिवाय या हॉटेलच्या परमिट रूमला 2013 पासूनच परवानगी आहे. त्यामुळे यात काहीही वावगे नाही. माध्यमांनी या विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करू नये असेही या दोघांनी सांगितले.
पुढे पाहा, या संबंधातील छायाचित्रे...