आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

98 जणांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य शिक्षक पुरस्कारासाठी राज्यातील 98 शिक्षकांची निवड झाली असून त्यात औरंगाबादच्या हेमलता जोशी व गणेशसिंह गौर यांचा समावेश आहे. यात 37 प्राथमिक, 38 माध्यमिक, 18 आदिवासी प्राथमिक, 2 कला व क्रीडा, 1 अपंग शाळा तसेच स्काऊट व गाइडमधील प्रत्येकी एका शिक्षकाचा समावेश आहे.
राज्य शिक्षक पुरस्कार योजनेला शालेय विभागातर्फे 1962-63 पासून सुरू करण्यात आली असून 10 हजार रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येतो. यंदाचा पुरस्कार सोहळा 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी होणार आहे.
मराठवाड्यातील मानकरी
माध्यमिक - गणेशसिंह गौर-औरंगाबाद, बाबूराव रामोड-नांदेड, राजेसाहेब शिंदे-लातूर, प्रमोद मुळे-परभणी, अशोक खरात-जालना, नूर अहमद घाटवाले उस्मानाबाद, जालिंदर पैठणे बीड,
प्राथमिक - हेमलता जोशी-औरंगाबाद, काशिनाथ खंडापूरे
परभणी, संजय शास्त्री जालना, शेख महमद नूर कासिम नांदेड, शोभा तिडके बीड, सुभाष वैरागकर उस्मानाबाद, मच्छिंद्र गुरमे लातूर व रावसाहेब
भोसले हिंगोली.
कला-क्रीडा : गणेश स्वामी- बीड.