आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Irrigation Minister Sunil Tatkares Scam Investigation

'आर्थिक गुन्हे शाखा करणार तटकरेंच्या घोटाळ्यांच्या आरोपांची चौकशी'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या जमीन घोटाळ्यांतील आरोपांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. सिंचन मुदद्यावरून विरोधकांनी विधानसभेत प्रचंड गोंधळ घातला.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधी पक्षाने गुरुवारी विधानसभेत आणलेल्या प्रस्तावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना जमीन घोटाळा प्रकरणी आणि राज्यमंत्री फौजिया खान यांना 26/11 हल्ल्यातील आरोपी जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल प्रकरणी लक्ष्य केले.
भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी तटकरे यांच्यावर होत असलेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी एफआयआर नोंदवून राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून याची चौकशी करण्याची मागणी केली.
यापूर्वी, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सुनील तटकरे यांच्यावर जमीन खरेदी घोटाळ्याचा आरोप केला होता. या प्रकरणी सोमय्या यांनी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे तक्रारही केली होती. तटकरे यांनी विविध कंपन्या उघडून केलेल्या जमीन घोटाळ्याबाबत राज्यपालांनी लक्ष घालावे, अशी सोमय्या यांनी विनंती केली होती. विशेष म्हणजे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडेही सोमय्यांनी तक्रार केली होती. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी तटकरेंची पाठराखण केली होती. तटकरेंवरील आरोप फेटाळून त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावरच टीका केली होती.
विरोधकांकडून सुनील तटकरे आणि फौजिया खान टार्गेट
पवारांकडून ‘तट’राखण!,तटकरेंवरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले
सुनील तटकरेंच्या कंपन्यांत संचालकपदी उद्धव ठाकरेंचे कुटुंबीय