आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम आदमी पक्षाची राज्यात जुळवाजुळव, शेतकरी-शेतमजूर हक्क परिषदेचे आयोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) राज्यात पुन्हा संघटन बांधणीस प्रारंभ केला आहे. या वेळी ग्रामीण भागाकडे पक्षाने मोहरा वळवला असून अमरावती येथे १० सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शेतकरी-शेतमजूर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी आम आदमी पक्षाचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया उपस्थित राहणार आहेत.   

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाने राज्यातील सर्व जागा लढवल्या होत्या. त्यातील दारुण पराभवानंतर पक्षाने राज्यातील विधानसभा न लढवण्याचा िनर्णय घेतला होता. तसेच अरविंद केजरीवाल यांनी राज्य समिती बरखास्त केली होती. त्यातच योगेंद्र यादव यांचा मोठा गट बाहेर पडल्यामुळे राज्यातील आम आदमी पक्षाचे उरलेसुरले नामोनिशाणही मिटले होते.  अाता ‘अाप’ पक्षाने राज्यात पुन्हा संघटन बांधणीस प्रारंभ केला आहे. या वेळी मेट्रो शहराऐवजी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याची सुरुवात १० सप्टेंबर रोजी विदर्भातील अमरावती येथे राज्यस्तरीय शेतकरी-शेतमजूर हक्क परिषदेने करण्यात येत आहे. 
 
मराठवाडा अाणि विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने या परिषदेस हजर राहावेत यासाठी पक्षाने नियोजन केले आहे. या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी आम आदमी पक्षाचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया उपस्थित राहणार आहेत. आम आदमीची राज्य समिती अद्यापही बरखास्त अाहे. प्रीती शर्मा-मेनन आिण मिरा सन्याल या मुंबईतील नेत्या केंद्रीय समितीत कार्यरत आहेत.
बातम्या आणखी आहेत...